New Parliament : भारताचे नवीन संसद भवन दिसते 'या' मंदिरासारखे, पाहा खास फोटो!

Rashmi Mane

फोटो व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 28 मे ला नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. लोकशाहीच्या नव्या इमारतीवरुन राजकारण सुरू असतानाच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे.

New Parliament building | Sarkarnama

प्रतिकृती

उद्घाटनापूर्वी नवीन संसदेचे फोटो इंटरनेटवर पाहून अनेक युजर्सने भारताच्या नवीन संसद भवनाला अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणजेच 'पेंटागॉनच्या' इमारतीची प्रतिकृती असल्याचेही म्हटले आहे.

America Pentagon | Sarkarnama

'विदिशा विजय मंदिर'

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नवीन संसद भवनाची रचना मध्य प्रदेशातील 'विदिशा विजय मंदिरा' सारखाच आहे, असा दावा केला जात आहे. विजय मंदिराचा आकार आणि संसदेचा आकार सारखाच आहे.

vidisha vijay mandir | Sarkarnama

मंदिराची बांधणी

इतिहासकारांच्या मते, विजय मंदिराची गणना देशातील सर्वात मोठ्या मंदिरांमध्ये केली जाते. हे मंदिर चालुक्य वंशाच्या राजाने विदिशाचा विजय शाश्वत करण्यासाठी बांधले होते.येथे भेलीस्वामीन (सूर्य) मंदिर बांधले होते. चालुक्य घराणे स्वतःला सूर्यवंशी मानत होते, म्हणून त्यांनी हे मंदिर बांधले. 10व्या आणि 11व्या शतकात परमार काळात परमार राजांनी त्याची पुनर्बांधणी केली होती.

vidisha vijay mandir | Sarkarnama

नवीन संसद भवन

विजय मंदिराकडे पाहिले तर त्याचा आकार आणि नवीन संसद भवनाच्या आकार सारखाच दिसतो.

New Parliament building | Sarkarnama

तोफ लावून हे मंदिर उडवले होते

मंदिराच्या विशालतेमुळे आणि प्रसिद्धीमुळे विजय मंदिर नेहमीच मुस्लिम सम्राटांच्या नजरेत राहिले आहे. औरंगजेबाने 1682 मध्ये तोफ लावून हे मंदिर उडवले होते. आक्रमणकर्त्यांनी हे मंदिर अनेकदा लुटले आणि फोडले. पण प्रत्येक वेळी त्याची पुनर्बांधणी केली गेली.

vidisha vijay mandir | Sarkarnama

पुरातत्व विभागाकडे

आता हे मंदिर बिजा मंडळ भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या संरक्षणाखाली आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे स्वच्छता व नूतनीकरणाची कामे सुरू आहेत.

vidisha vijay mandir | Sarkarnama

जुने संसद भवन

देशाच्या सध्याच्या संसदेची इमारत देखील मध्य प्रदेशातील मुरैना येथील 'चौसठ योगिनी' मंदिराप्रमाणेच तयार करण्यात आली आहे, जी ब्रिटिश आर्किटेक्ट 'एडविन लुटियन्सने' बांधली होती.

vidisha vijay mandir | Sarkarnama

काशी विश्वनाथ ते नवीन संसद भवन, पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्टचे 'आर्किटेक्ट' बिमल पटेल आहेत तरी कोण?