Rashmi Mane
देशाचे नाव इंडिया असावे की भारत याबद्दल चांगलाच वाद पेटला आहे.
'G - २०' शिखर परिषदेच्या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर त्यांच्या पदाचा उल्लेख 'प्रेसिडंट ऑफ इंडिया' ऐवजी 'प्रेसिडंट ऑफ भारत' करण्यात आल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
काँग्रेसनं ही बाब निदर्शनास आणत केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या टीकेनंतर मोदी सरकार देशाचं नाव बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
खरं तर भारताच्या नावामागे एक रंजक इतिहास आहे. भारत या नावाचा उल्लेख प्राचीन काळापासून केला जातो.
पण भारत हे नाव पहिल्यांदा पोर्तुगीज संशोधकांनी 16 व्या शतकात वापरले.
18 सप्टेंबर 1949 रोजी जेव्हा डॉ. आंबेडकरांनी संविधानाच्या मसुद्यात सुधारणा केली आणि कलम 1 नुसार भारत म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल असे म्हटले होते.
बऱ्याच चर्चेनंतर भारतीय संस्कृती, भारतीय भाषांमध्ये लिहिलेले ऐतिहासिक साहित्य, धार्मिक ग्रंथ, लोकांच्या श्रद्धा, त्यांच्या संलग्नता आणि भावना लक्षात घेऊन भारत या शब्दाला योग्य तो सन्मान दिला जाईल, असे ठरले. या सर्व बाबींचा विचार करूनच भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीलाच 'भारत' असे लिहिले आहे.