Republic Day Chief Guests : प्रजासत्ताक दिनाला येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांची निवड कशी होते?

Roshan More

निवड प्रक्रियेची सुरुवात

प्रजासत्ताक दिनाला येणाऱ्या पाहुण्यांची निवड प्रक्रिया सहा महिने आधीच सुरु होते.

लष्करी, आर्थिक सहकार्य

निवड प्रक्रियेसंदर्भात ज्या देशाच्या पाहुण्याला बोलावयचे आहे त्याचे भारताशी राजकीय, लष्करी आणि आर्थिक सहकार्य कसे आहे, हे पाहिले जाते.

यादी तयार होते

भारताशी सहकार्य करणाऱ्या देशाच्या प्रमुखांची यादी तयार केली जाते. त्यातून ज्यांच्याशी भारताला संबंध अधिक दृढ करायचे आहेत. अशा राष्ट्रप्रमुख अथवा त्या देशातील प्रमुख व्यक्तीची निवड केली जाते

मंजुरी

यादीतील नावांवर पंतप्रधान कार्यालय (PMO) आणि राष्ट्रपतींची सहमती घेतली जाते.

प्रोटोकॉल आणि सुरक्षा

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून येणाऱ्या व्यक्तीला 'State Guest' चा दर्जा दिला जातो. त्यांच्या सुरक्षेसाठी आणि आदरातिथ्यासाठी विशेष प्रोटोकॉल पाळले जातात

सुरक्षा व्यवस्था

प्रमुख पाहुण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलिस आणि निमलष्करी दलांसोबतच त्यांच्या स्वतःच्या देशातील सुरक्षा यंत्रणांशी समन्वय साधून पार पाडली जाते.

यंदाचे प्रमुख पाहुणे

युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा हे यंदा प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत.

NEXT : 'फायटर जेट्स'चा थरार, आकाशात रंगांची उधळण; नाशिकच्या आकाशात भारतीय वायुसेनेचे 'शौर्य दर्शन'

येथे क्लिक करा