Rini Sampath : अमेरिकेच्या सत्तेच्या केंद्रस्थानी आता भारतीय चेहरा; कोण आहेत महापौरपदाच्या रिंगणात उतरल्या भारतीय वंशाच्या रिनी संपत?

Rashmi Mane

ऐतिहासिक क्षण

वॉशिंगटन, डीसी मध्ये पहिल्यांदाच भारतीय वंशाची उमेदवार महापौरपदाच्या रिंगणात उतरली आहे. हा क्षण शहराच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

कोण आहेत रिनी संपत?

रिनी संपत या 31 वर्षीय सायबरसिक्युरिटी तज्ज्ञ आहेत. त्यांचा जन्म थेनी येथे झाला आणि त्या लहान वयात अमेरिकेत गेल्या.

'अमेरिकन ड्रीम’चा प्रवास

वयाच्या 7 व्या वर्षी त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. आज त्या दशकभरापासून वॉशिंगटन, डीसीमध्ये राहत असून, नागरिकांसाठी संधी निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश आहे.

निवडणूक लढवण्यामागचं कारण

रिनी सांगतात की, लोक राष्ट्रीय राजकारणाशी जोडलेले असले तरी स्थानिक प्रशासनापासून दूर आहेत. ही दरी कमी करून प्रशासन लोकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे ध्येय आहे.

‘Fix the Basics’ अजेंडा

त्यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा ‘Fix the Basics’ आहे. स्वस्त घरं, कमी भाडे आणि रस्त्यांची दुरुस्ती यावर त्या भर देत आहेत.

शहर विकासावर भर

त्या 911 सेवांची गती वाढवणे, सुरक्षित रस्ते, सायकल ट्रॅक, सार्वजनिक वाहतूक आणि स्वच्छ हरित परिसर यासाठी गुंतवणूक करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहेत.

बदलाची नवी आशा

रिनी संपत शिक्षण, आरोग्य, कमी कर आणि लहान व्यवसायांना मदत यावर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यांचा संदेश स्पष्ट आहे. शहर प्रत्येकासाठी न्याय्य आणि सुरक्षित बनवायचं.

Next : शेतकऱ्यांनो, आता दिवस फिरणार! सरकारच्या 'या' तीन योजना ठरतील 'गेम चेंजर'

येथे क्लिक करा