Amit Ujagare
भारतीय रेल्वेमध्ये आणि स्टेशनवर मिळणारं बाटलीबंद पाणी 'रेल नीर' आता स्वस्त झालं आहे. जीएसटी कमी झाल्यानं पाण्याची बाटली स्वस्त झाली आहे.
आता 'रेल नीर'ची बाटली १५ रुपयांवरुन १४ रुपये असणार आहे. तर अर्धा लीटर पाण्याची बाटली १० रुपयांवरुन ९ रुपये असणार आहे.
'रेल नीर' हा भारतीय रेल्वेचा स्वतःचा ब्रँड आहे. २००३ मध्ये आयआरसीटीसीकडून हे बाटली बंद पाणी विकलं जातं.
आता पाहुयात 'रेल नीर'च्या माध्यमातून रेल्वे नेमकं किती पैसे कमावतं?
IRCTC प्रामुख्यानं चार सेवांमधून पैसे कमावते, यामध्ये खानपान, रेल नीर, ऑनलाईन तिकीटविक्री आणि पर्यटन यांचा समावेश आहे.
या सर्व प्रकारांपैकी रेल्वेला सर्वाधिक कमाई ही पाणी विकून होते. कंपनीनं २०२५ च्या चौथ्या तिमाहीत 'रेल नीर' विकून तब्बल ९६ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.
आयआरसीटीसीच्या एकूण उत्पन्नात ११.८ टक्के वाढ होऊन ती १,१५९.६ कोटी रुपये झाली आहे. जी गेल्यावर्षी १,११७.५० कोटी रुपये होती. (फोटोतील आकडेवारी जुनी आहे)
उत्पन्नातील ही वाढ खानपान, रेल नीर, ऑनलाईन तिकीट विक्री, पर्यटन या चार सेवांमधून झाली आहे. (फोटोतील आकडेवारी जुनी आहे)