Amit Ujagare
ब्रिटिश इंडियात रेल्वे पहिल्यांदा भारतीय भूमीवरुन धावली. त्यानंतर या रेल्वेमध्ये अनेक बदल झाले. आधी वाफेवर, कोळशावर, डिझेवर, वीजेवर चालणाऱ्या रेल्वे गाड्या आल्या. आता पुन्हा एकदा भारतीय रेल्वे कात टाकण्याच्या तयारीत आहे.
नवी डिझाईन आणि सोयी-सुविधा यांच्यासह नवं इंजिनिअरिंगही आता भारतीय रेल्वेमध्ये पाहायला मिळणार आहे.
भारताची पहिली हायड्रोजन रेल्वे हे शाश्वत, स्वच्छ आणि इकोफ्रेन्डली पायाभूत सुविधांच्या दिशेने टाकलेलं एक ऐतिहासिक पाऊल असणार आहे.
त्याचबरोबर जगातील सर्वात लांब हायड्रोजन रेल्वेचा संच (Trainset) भारत विकसित करणार आहे.
हायड्रोजन इंधनामुळं शून्य प्रदुषण होणार असून या इंजिनामधून केवळ पाण्याची वाफ उत्सर्जित होणार आहे.
या हायड्रोजन रेल्वेला १० कोच असणार आहेत, हे इंजिन २,४०० किलोवॅट इतकी ऊर्जा निर्माण करणारं हे पॉवरहाऊस असणार आहे. जी पहिल्यांदा हरयाणातील जिंद आणि सोनिपत दरम्यान धावणार आहे.
या रेल्वेचा जास्तीत जास्त वेग हा ७५ किमी प्रतितास इतका असणार आहे. या हायड्रोजन इंधनाच्या रेल्वे इंजिनमधून शून्य कार्बन उत्सर्जन होणार आहे.
जागतिक स्तरावर हायड्रोजन ट्रेन्स वापरणाऱ्या देशांच्या यादीत आता भारताचाही समावेश झाला आहे.