Aslam Shanedivan
रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करणे अत्यंत सोयीचा आणि आरामदायी पर्याय असून अनेक जण याचा वापर करतात.
पण आता रेल्वेच्या नव्या नियमानुसार मोबाईलच्या वापरात नियंत्रण घालावे लागणार आहे.
दक्षिण रेल्वेने लागू केलेला अत्यंत कडक आणि नवा नियम मोडल्यास 1,000 रुपयांच्या दंडापासून 6 महिन्यांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि त्रासमुक्त व्हावा या उद्देशानेच हा नवा नियम लागू करण्यात आला आहे.
रेल्वे प्रवासात किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मवर मोबाईलवर गाणी किंवा व्हिडिओ मोठ्या आवाजात लावल्यास दंड केला जाणार आहे.
प्रवासादरम्यान प्रवाशांची मोठी गैरसोय टाळण्यासाठी दक्षिण रेल्वेने हा कडक नियम केला आहे.
विना तिकीट प्रवास करणे, अस्वच्छता पसरवणे किंवा विनाकारण साखळी ओढणे या सोबतच आता मोठ्या आवाजात मोबाईल वाजवणेही गंभीर गुन्हा ठरणार आहे.
प्रवासादरम्यान मोबाईलवर गाणी ऐकण्यासाठी किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी हेडफोन किंवा इयरफोनचा वापर करावा.