Jagdish Patil
ज्योती मल्होत्रा या भारतीय युट्यूबरला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तिच्यासह अन्य 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
ज्योतीने भारताशी गद्दारी करत पाकिस्तानसाठी हेर म्हणून काम केल्याचा पुरावा तिच्याच एका व्हिडीओतून मिळाला आहे.
ज्योतीचं 'ट्रॅव्हल विथ जो' नावाचं युट्यूब चॅनल आहे. याच व्हिडीओतून तिने पाकिस्तानसाठी हेर म्हणून काम केल्याचं उघडकीस आलं आहे.
ती व्हॉट्सॲप, टेलिग्रामच्या माध्यमातून पाकिस्तानी ऑपरेटिव्ह राणा शाहबाजच्या संपर्कात होती. याचा नंबर तिने जट रंधवा या नावाने मोबाईलमध्ये सेव्ह केला होता.
शिवाय सोशल मीडियावर पाकिस्तानबद्दल सकारात्मकता निर्माण करण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात आली होती.
तिच्याविरोधात पुरावे मिळताच कलम 152 आणि ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट, 1923 च्या कलम 3,4,5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ट्रॅव्हल विथ जो चॅनेलवरील एका व्हिडीओत ती पाकिस्तानचा उच्च अधिकारी एहसान उर रहीम अलियास दानिशसोबत दिसत आहे.
भारतीय लष्कराबाबतची गोपनीय माहिती तिने पाकिस्तानला पुरवल्याचं आणि रहीमच्या पत्नीची भेटीगाठी अनेकदा झाल्याचं व्हिडीओतून समोर आलं आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार कमिशन एजंट्सच्या माध्यमातून व्हिसा मिळाल्यानंतर ज्योतीने 2023 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता.
तिने नुकताच पाकिस्तानी अधिकाऱ्यासह इंडोनेशिया आणि बालीचा दौरा केला होता. पाकिस्तानला सकारात्मक दाखवण्याचे आणि भारताची हेरगिरी करण्याचे पैसे तिला मिळायचे