Rashmi Mane
भारत सरकारने 2021 मध्ये होणारी जनगणना कोविड-19 महामारीमुळे पुढे ढकलली होती. आता ही जनगणना 2026 च्या अखेरीस पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे
या जनगणनेत पहिल्यांदाच सर्व जातींची माहिती संकलित केली जाणार आहे, ज्यामुळे सामाजिक न्यायाच्या धोरणांना अधिक आधार मिळेल.
भारतात प्रथमच जनगणनेची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल माध्यमातून होणार आहे.
यासाठी मोबाईल अॅप्स आणि टॅबलेट्सचा वापर होणार आहे.
नागरिकांना स्वतःहून ऑनलाईन माहिती भरता येणार.
एक सेल्फ-एन्प्युमरेशन पोर्टल तयार करण्यात येणार आहे.
जनगणनेचे अॅप आणि पोर्टल 13 प्रमुख भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल.
त्यामुळे भाषेचा अडथळा निर्माण होणार नाही.
नागरिकांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी कडक सायबर सुरक्षा उपाययोजना केल्या जातील.
डेटा एनक्रिप्शन आणि क्लाउड स्टोरेजचा वापर केला जाईल.
सर्व घरे, वस्त्या आणि शहरी भागांचे मॅपिंग GIS (Geographic Information System) च्या मदतीने केले जाईल
या जनगणनेमध्ये कागदाचा वापर न करता संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस असेल.
यामुळे पर्यावरणपूरक उपक्रमालाही चालना मिळेल.
जनगणना आधार क्रमांकाशी लिंक केली जाऊ शकते, जेणेकरून डुप्लिकेट नोंदी टाळता येतील. त्यामुळे अचूकता आणि वेग वाढणार.
डिजिटल पद्धतीमुळे माहिती संकलन अधिक अचूक आणि जलद होईल.
डेटा विश्लेषणासाठी AI आणि Big Data चा वापर केला जाईल.