इंदिरा गांधींच्या 'या' धाडसी निर्णयांनी जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला...

सरकारनामा ब्युरो

हरित आणि श्वेत क्रांती : जेव्हा देश दुष्काळामध्ये होरपळत होता तेव्हा हरितक्रांतीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन, देशात कृषी क्षेत्राला चालना दिली.

Indira Gandhi 105'th birth anniversary | Sarkarnama

बँकांचे राष्ट्रीयीकरण : बँकांचे फायदे सर्वसामान्यांना मिळावेत यासाठी 19 जुलै 1969 ला इंदिरा गांधी यांनी बँकाचे राष्ट्रीयीकरण करण्याचा धाडसी निर्णय घेतला. हा निर्णय सरकारने घेतलेला सर्वात कठीण निर्णयापैकी एक होता.

Indira Gandhi 105'th birth anniversary | Sarkarnama

1971 चे युध्द आणि बांगलादेशची निर्मीतीः पाकिस्तान वेगळा झाल्यापासून त्याच्या पुर्व भागात हुकूमशाही सुरू होती. इंदिराजींनी पु्र्व पाकिस्तानात सैन्य पाठवून तो भाग मुक्त केला आणि बांगलादेशाची निर्मीती झाली. या निर्णयामुळे त्यांना 'आर्यन लेडी' म्हणून जगभर ओळखले जाऊ लागले.

Indira Gandhi 105'th birth anniversary | Sarkarnama

पोखरण अणु चाचणी – १९७४ : चीन कडून येणारा धोका टाळण्यासाठी अण्विक उपकरणांची चाचणी अधिकृत करण्याचा निर्णय इंदिराजींनी घेतला. त्यामुळे 1974 मध्ये पोखरण येथे स्माइलिंग बुद्ध नावाची अणुचाचणी यशस्वी रित्या पार पडली. यामुळे जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढली.

Indira Gandhi 105'th birth anniversary | Sarkarnama

आणीबाणी 1975ः राष्ट्रिय आणीबाणीची घोषणा हा भारताच्या स्वतंत्र्योत्तर इतिहासातील सर्वात मोठा निर्णय ठरला. आणीबाणी जाहीर करण्यामागे राष्ट्रिय सुरक्षेला धोका असल्याचे कारण सांगत आणीबाणी जाहीर केली होती.

Indira Gandhi 105'th birth anniversary | Sarkarnama

ऑपरेशन ब्लू स्टारः पंजाबमध्ये खलिस्तानची मागणी जोर धरत होती. त्यामुळे संपूर्ण देश दहशतवादाच्या विळख्यात सापडला होता. सुवर्ण मंदिरात तळ ठोकून बसलेल्या अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टार सुरू केले.

Indira Gandhi 105'th birth anniversary | Sarkarnama

गरिबी हटवा - इंदिरांजींच्या विरोधकांनी 1971 मध्ये इंदिरा गांधींविरुद्ध इंदिरा हटाओ'ची घोषणा दिल्यावर इंदिरांनी गरिबी हटाओ ही घोषणा दिली. 

Indira Gandhi 105'th birth anniversary | Sarkarnama

अमेरिकेशी अन्नधान्य करारः इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर देशात सर्वांत मोठी अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे इंदिरांनी अमेरिकेशी अन्नधान्याबाबत करार केला.

Indira Gandhi 105'th birth anniversary | Sarkarnama

संस्थानिकांचे भत्ते थांबवले – भारताच्या स्वातंत्र्यावेळी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलांनी 550 स्वतंत्र संस्थानांना भारतात विलीन करून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना मोठे भत्ते मंजूर केले होते. ते थांबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय इंदिरा गांधी यांनी केला.

Indira Gandhi 105'th birth anniversary | Sarkarnama
Sarkarnama