48 Years Completed For Emergency : 'हे' कारण देत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी केली होती आणीबाणीची घोषणा....

Deepak Kulkarni

आणीबाणीची घोषणा

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यामार्फत २५ जून 1975 ला देशात आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती.

Emergency 1975 | Sarkarnama

तत्कालीन राष्ट्रपतींची ड्राफ्टवर सही....

तत्कालीन पंतप्रधानांच्या सांगण्यावरुन तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी त्या रात्री देशात आणीबाणी लागू करणार्‍या ड्राफ्टवर सही केली होती.

Emergency 1975 | Sarkarnama

४८ वर्ष पूर्ण

भारतात १९७५ साली लावण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळाला रविवारी (दि.२५) ४८ वर्ष पूर्ण झाली आहेत. 

Emergency 1975 | Sarkarnama

सर्वांनाच धक्का

26 जून 1975 च्या सकाळी जेव्हा देशात आणीबाणीची बातमी पसरली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता.

Emergency 1975 | Sarkarnama

21 महिने आणीबाणी

26 जून 1975 पासून 21 जून 1977 या 21 महिन्यांच्या कालावधीत भारतात आणीबाणी होती.

Emergency 1975 | Sarkarnama

लोकसभा निवडणूकही स्थगित

देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण देत इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली जात असल्याचे सांगितले होते. आणीबाणीच्या काळात लोकसभा निवडणूकही स्थगित केली होती.

Emergency 1975 | Sarkarnama

सरकार आणि सत्तेविरोधात आवाज उठवणाऱ्यांना जेल...

आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी सरकार आणि सत्तेविरोधात आवाज उठवणाऱ्या हजारो लोकांना जेलमध्ये टाकलं होतं.

Emergency 1975 | Sarkarnama

मोठ मोठे नेतेमंडळीही तुरुंगात..

इंदिरा सरकारविरुद्ध संघर्षाचं बिगुल वाजवणारे लोकनायक जयप्रकाश नारायण आणि मोरारजी देसाई यांसारखे नेते तसंच सरकारची टीका करणारे पत्रकार, समाजसेवक, विविध संघटनांचे लोक आणि विद्यार्थी यांची रवानगी तुरुंगात केली होती.

Emergency 1975 | Sarkarnama

आणीबाणीनंतर अशी चर्चा...

राजकीय महत्त्वाकांक्षा आणि सत्ता जाण्याच्या भीतीने इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केल्याचं म्हटलं जातं.

Emergency 1975 | Sarkarnama

महत्त्वाच्या घटनेचा साक्षीदार

इतिहासात 25 जून हा दिवस भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटनेचा साक्षीदार आहे.

Emergency 1975 | Sarkarnama

NEXT : जिल्हाधिकाऱ्यांनाच विचारलं तुम्ही क्लर्क आहात का? आयएएस अधिकाऱ्यांनी दिलं भन्नाट उत्तर !

येथे क्लिक करा...