सरकारनामा ब्यूरो
इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला.
घरातील वातावरणामुळे इंदिरा गांधी या लहानपणापासूनच क्रांतिकारी वृत्तीच्या होत्या. त्यांना नेतृत्व करायची आवड होती.
वयाच्या 13व्या वर्षी मुला-मुलींची संघटना करून 1930 मध्ये अलाहाबादमध्ये 'वानर सेना' स्थापन केली.
वानर सेना आंदोलनाच्या काळात क्रांतिकारांना माहितीची देवाण-घेवाण व सावधानतेचा इशारा देण्याचे काम करत होत्या.
'वानर सेने'तील सगळी मुले सैनिकी शिस्तीचे होते.
काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
ठिकठिकाणी जनतेची सेवा करण्याचे काम वानर सेना करत होती.
'इंदूची वानर सेना' जखमी आंदोलकांना औषधे, गोळ्या, जेवण पुरवणे आणि इतर मदत करत होती.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात इंदिरा गांधींच्या वानर सेनेचा खारीचा वाटा असल्यामुळे इंदूच्या कार्यावर महात्मा गांधी अत्यंत खूष होते