रेल्वे प्रवास आता आणखी खर्चिक! स्नॅक्सच्या दरात मोठी वाढ; काय काय महागलं?

Amit Ujagare

१) इंधन दरवाढ

देशात सध्या इंधनाचे दर सातत्यानं वाढत आहेत, तत्पूर्वी स्वयंपाकाच्या गॅसचेही दर वाढले आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांवर महागाईचा डोंगर कोसळल्याची स्थिती आहे.

Railway Food

२) रेल्वेतील स्नॅक्सचे दर वाढले

त्यातच आता इंधनाचे दर वाढल्यानं रेल्वे स्थानकांत मिळणाऱ्या स्नॅक्सचे दरही वाढवले आहेत. मध्य रेल्वेनं विविध पदार्थांचे दर वाढवण्यास मंजुरी दिली आहे. हे नवे दर १ जून २०२६ पासून लागू होणार आहेत.

Railway Food

३) कुठल्या पदार्थ्यांचा समावेश

यामध्ये विविध पदार्थांचा समावेश आहे. पण नेमके कोणत्या पदार्थ्यांचे दर वाढलेत जाणून घेऊयात.

Railway Food

४) दर वाढवलेले पदार्थ

वडा+पाव (15+5= ₹20), उसळपाव (₹25), व्हेज समोसा (₹20), व्हेज सँडवीच (₹35), व्हेज चीज सँडवीच (₹45), पॅटीस (₹20), साबुदाना वडा (₹20), ढोकळा (₹25), सर्व प्रकारचे लाडू (₹20), व्हेज फ्रँकी (₹30), व्हेज चीज फ्रँकी (₹45), सुक्की भेळ (₹25), चटनी भेळ (₹30), पोहे (₹20), साधा डोसा (₹25).

Railway Food

५) दर वाढलेले पदार्थ

मसाला डोसा (₹35), उत्तप्पा (₹30), मसाला उत्तप्पा (₹35), पाव भाजी (₹50), दही वडा (₹35), व्हेज कटलेट (₹35), छोले पुरी (₹40), मेदू वडा (₹35), इडली सांभार (२) (₹30), दाळवडा (₹35), ब्रेड पकोडा (₹25), मिक्स भजी (₹25), मुगाची भजी (₹30), व्हेज रोल (₹30), व्हेज पिझ्झा (₹50), टोमॅटो सूप (₹20).

Railway Food

६) दर न वाढलेले पदार्थ

पॉपकॉर्न (₹10), फ्लेवर्ड पॉपकॉर्न (₹20), कचोरी (₹15), गुलाबजाम (₹15), फ्रेश ज्यूस (₹25), फाऊंटन सोडा (₹10), फ्लेवर्ड सोडा (₹15).

Railway Food

७) दर न वाढलेले पदार्थ

अॅपल ज्यूस (₹40), उपमा (₹25), दाबेली (₹20), क्रीम डोनेट (₹15), स्लश (₹30), सॉफ्टी (₹20), व्हेज नूडल्स (₹50), मिसळ पाव (₹35). या पदार्थ्यांच्या किंमती वाढलेल्या नाहीत.

Railway Food

८) दोन भाषांमध्ये रेटकार्ड

त्याचबरोबर प्रवाशांच्या सुविधेसाठी सर्व रेल्वे स्थानकांवर दोन भाषांमध्ये पदार्थ्यांचं रेट कार्ड लावणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

Railway Food