Rashmi Mane
पवारांचं निवासस्थान 'सिल्वर ओक' कायमचं महाराष्ट्रातील राजकारणच्या केंद्रस्थानी राहिलं आहे.
सिल्व्हर ओक हे एका झाडाचं नाव असलं, तरी महाराष्ट्रासाठी तो पवार साहेबांचा मुंबईतला बंगला म्हणून फेमस आहे.
दक्षिण मुंबईतील 'नेपियर सी' रोड जवळ २२ हजार स्क्वेअर फूट इतकी पसरलेली सिल्व्हर ओक इस्टेट सोसायटी आहे.
आज हे पवारांचं घर म्हणून ओळख मिळाली असली तरी ही एकेकाळी पारसी समुदायाची सोसायटी होती.
फक्त पारसी कुटूंबियांसाठी असलेल्या या सोसायटीमध्ये साधारण नव्वदच्या दशकात इतर समुदायातील लोकांना ही घर घेण्यास परवानगी मिळाली.
साधारण २०१३ साली तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आपलं निवासस्थान सिल्वर ओक इस्टेट मधील बंगला क्रमांक २ इथे हलवले.
३००० हजार स्क्वेअर फूट इतका एरिया असलेल्या या दुमजली बंगल्यात शरद पवार वास्तव्य करतात.
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी, राजकारणी शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर जात असतात.