International Women's Day: कसा सुरू झाला 'जागतिक महिला दिन'; जाणून घ्या त्या मागील रंजक इतिहास

सरकारनामा ब्यूरो

दरवर्षी ८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिला दिनाचा इतिहास, महत्त्व काय आहे, हे जाणून घ्या.

Womens Day special | Sarkarnama

'क्लारा झेटकीन' या महिलेने 1910 साली जागतिक महिला दिनाची सुरुवात केली. खर या दिवसाचा उगम कामगार चळवळीतून झाला.

Womens Day special | Sarkarnama

महिला दिनाचं बीज रोवलं गेल ते 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात एकत्र येऊन निदर्शने करत रस्त्यांवर मोर्चा काढला.

Womens Day special | Sarkarnama

कामाचे तास कमी, चांगला पगार आणि मतदानाचा अधिकार, कामाच्या जागी सुरक्षितता या त्यांच्या मागण्या होत्या.

Womens Day special | Sarkarnama

अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाल्या.

Womens Day special

1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा `जागतिक महिला दिन' म्हणून स्वीकारावा हा क्लारा यांनी मांडलेला ठराव पास झाला. 

Womens Day special | Sarkarnama

पुढे 1975 हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. 

Womens Day special | Sarkarnama

1975 या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' साजरा करण्याचे ठरविले.

Womens Day special | Sarkarnama

त्यानंतर 1977 पासून संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे.

Womens Day special