IPS D Roopa : या 'लेडी सिंघमने' थेट मुख्यमंत्र्यांना केली होती अटक; 20 वर्षात चक्क 40 वेळा बदल्या!

Rashmi Mane

आयपीएस रुपा मुदगील

आयपीएस डी रूपा यांचे नाव देशातील सर्वात धडाकेबाज आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये घेतले आहे.

IPS D Roopa | Sarkarnama

UPSC 2000 बॅचचे अधिकारी

IPS D रूपा मुदगील या 2000 च्या UPSC बॅचच्या अधिकारी आहेत. 24 वर्षांच्या IPS कारकिर्दीत त्यांनी अनेक चढउतार पाहिले.

IPS D Roopa | Sarkarnama

शिक्षण

अभ्यासात अव्वल ठरलेल्या IPS रुपा यांनी कर्नाटकातील कुवेम्पू विद्यापीठातून पदवी घेतली आहे.

IPS D Roopa | Sarkarnama

यूपीएससीमध्ये रँक

पदवीनंतरच त्यांनी नागरी सेवा परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. IPS रुपा यांना UPSC 2000 मध्ये 43 वा क्रमांक मिळाला.

IPS D Roopa | Sarkarnama

प्रशिक्षण

यानंतर त्यांने राष्ट्रीय पोलीस अकादमीतून प्रशिक्षण घेतले आणि त्यातही त्यांनी 5वा क्रमांक मिळावला.

IPS D Roopa | Sarkarnama

20 वर्षात 40 बदल्या

आयपीएस झाल्यानंतर डी रूपा यांना अनेक जिल्ह्यांमध्ये पोस्टिंग मिळाले. 20 वर्षांच्या कारकिर्दीत चक्क 40 वेळा त्यांची बदली झाली आहे. त्यांना मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

IPS D Roopa | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांना अटक

रूपा यांनी 2004 मध्ये मध्य प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री उमा भारती यांना अटक करून संपूर्ण देशाला हादरवून सोडले तेव्हा त्यांचे नाव चर्चेत आले. हुबळी न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांनी मुख्यमंत्र्यांना अटक केली होती.

IPS D Roopa | Sarkarnama

सोशल मीडियावर सक्रिय

IPS रुपा सोशल मीडियावर सक्रिय आसतात. त्यांची बहीण आयआरएस रोहिणी दिवाकर या आयकर विभागात सहआयुक्त आहेत.

IPS D Roopa | Sarkarnama

Next : सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करणारे मंत्रिमंडळ बैठकीतील 14 महत्त्वाचे निर्णय

येथे क्लिक करा