Rashmi Mane
'आयपीएस' मीरा बोरवणकर यांना फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशाभरात 'सुपरकॉप' म्हणून ओळखले जाते.
बोरवणकर या मूळच्या पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.
त्या 1981 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून त्या 2017 ला निवृत्त झाल्या.
बोरवणकर यांचे वडील ओ.पी. चढ्ढा हे सीमा सुरक्षा दलात (BSF) मध्ये होते. त्यांची पोस्टिंग फाजिल्का येथे होती. मीराने शालेय शिक्षण फाजिल्का येथेच पूर्ण केले.
बोरवणकर या माजी 'आयपीएस' अधिकारी किरण बेदी यांची प्रेरणा घेऊन त्या भारतीय प्रशासकीय सेवेशी जोडल्या गेल्या. त्यांचे पती अभय बोरवणकर हे देखील भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होते.
'आयपीएस' पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मीरा बोरवणकर यांना महाराष्ट्र केडरचा पदभार मिळाला. मुंबईतील माफिया राज संपवण्यात बोरवणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
दाऊद इब्राहिम कासकर आणि छोटा राजन टोळीतील अनेक लोकांना तुरुंगात टाकले आहे, त्यांनी अंडरवर्ल्डमध्येही आपली दहशत निर्माण केली होती.
2008 च्या मुंबई अतिरेकी हल्ल्यातील दोषी अजमल कसाब आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला बोरवणकर यांच्या देखरेखीखाली फाशी देण्यात आली.
2014 ला प्रदर्शित झालेला राणी मुखर्जीचा 'मर्दानी' चित्रपट मीरा बोरवणकर यांच्या जीवनावर आधारित आहे.