Rashmi Mane
पंजाबमधील गुरुदासपूरच्या नवजोत सिमी या बिहार केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत.
त्या सोशल मीडियावर सक्रिय असतात आपल्या आयुष्यातील अपडेट्स शेअर करत असतात.
सिमी यांचे सुरुवातीचे शिक्षण पंजाबमधील पखोवाल येथील मॉडेल पब्लिक स्कूलमध्ये झाले. तसेच त्यांनी जसवंत सिंग डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमधून बॅचलरचे शिक्षण घेतले आहे.
डॉक्टर झाल्यानंतर काही काळातच त्यांनी करिअर बदलण्याचा विचार केला. त्यानंतर नवजोत सिमीने यूपीएससीची तयारी सुरू केली. 2016 मध्ये त्यांनी पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली अयशस्वी ठरल्या.
2017 मध्ये त्याने पुन्हा यूपीएससीची परीक्षा दिली. 735 रँक मिळवत त्या युपीएससी परिक्षेत यश मिळवले.
नवजोत सिमी सध्या 'सीआयडी' पाटणामध्ये 'एसपी' म्हणून तैनात आहेत.
नवजोत सिमी यांचे पती तुषार सिंगला हे IAS अधिकारी आहेत.
नवजोत सिमी यांचे इंस्टाग्रामवर 12 लाख फॉलोवर्स आहेत.