Deepak Kulkarni
जन्मभूमी हिमाचल प्रदेश....
धडाकेबाज आयपीएस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या मोहिता या मूळच्या हिमाचल प्रदेश येथील कांगडा येथील आहेत.
पाचव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळवेल्या मोहिता यांनी पोलिस सेवेत ठसा उमटवला आहे.
त्यांच्याबद्लची विशेष बाब म्हणजे त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगात काम करण्याचा अनुभवही घेतला आहे.
त्यांनी आपले शालेय शिक्षण द्वारका येथून पूर्ण केले असून. त्यांनी भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बीटेकचे शिक्षण घेतले.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनही त्यांना फॉलो करतात. IPS मोहिता शर्मा 2020 मध्ये ‘कौन बनेगा करोडपती’ च्या सीझन 12 मध्ये सामील झाल्या होत्या. त्यात त्या यशस्वीही झाल्या. IPS मोहिता शर्मा यांनी शोमध्ये एक कोटी रुपये जिंकले.
आयपीएस मोहिता शर्मा या जम्मू-काश्मीरच्या अधिकारी आहेत. त्या 2017 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.
त्यांनी यूपीएससी परीक्षेत 262 वा क्रमांक मिळवला होता. प्रचंड मेहनत, चिकाटीमुळे आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांना साकार करता आले.
IPS मोहिता शर्मा यांनी 2019 मध्ये IFS अधिकारी रुशल गर्ग यांच्यासोबत लग्न केले. रुशल हे मोहाली, चंदीगडचे रहिवासी आहेत. UPSC परीक्षेत त्यांनी 58 वा क्रमांक मिळविला आहे.
आयपीएस अधिकारी असूनही मोहिता शर्मा यांना इन्स्टाग्रामवर तब्बल 92 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्या अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसून येतात.