Amol Sutar
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने आयपीएस प्रशांत कुमार यांची प्रभारी पोलिस महासंचालक (डीजीपी) म्हणून नियुक्ती केली.
उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये सिंघम म्हणून ओळखले जाणारे प्रशांत कुमार हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विश्वासू मानले जातात.
ते 1990 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची पोलीस मुख्यालयात पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
प्रभारी DGP पदावर असलेले विजय कुमार बुधवारी निवृत्त झाले. त्यांच्या जागी प्रशांत कुमार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
त्यांनी आतापर्यंत 300 हून अधिक एन्काउंटर केले आहेत, तर त्याच्या देखरेखीखाली 1 हजाराहून अधिक गुन्हेगारांचा सामना करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
विशेषतः गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ते ओळखले जातात. यामुळेच योगी सरकारमध्ये त्यांना या अत्यंत महत्त्वाच्या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
IPS होण्यापूर्वी त्यांनी MSc, MPhil आणि MBA चे शिक्षण घेतले होते. 1990 मध्ये त्यांची IPS पदासाठी निवड झाली आणि त्यांना तामिळनाडू केडर देण्यात आले.
ते बिहारमधील सिवान जिल्ह्यातील रहिवासी आहेत. हुसैनगंज विभागात हथौडी गावात त्यांचे घर आहे.
300 एन्काउंटर करणाऱ्या प्रशांत कुमार यांना 26 जानेवारीला शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.