Rashmi Mane
रवि मोहन सैनी यांनी 2001 मध्ये 'कोण बनेगा करोडपती' मध्ये भाग घेत जिंकले होते एक कोटी रुपये.
रवी मोहन सैनीने अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेल्या 'कौन बनेगा करोडपती ज्युनिअर' हा गेम शो जिंकला. या शोमध्ये 15 कठीण प्रश्नांची उत्तरे देऊन त्याने 1 कोटी रुपये जिंकून इतिहास रचला.
रवि सैनी यांना त्यांच्या वडिलांकडून प्रेरणा मिळाली. त्यांचे वडिल नौदलात अधिकारी होते.
रवि सैनी यांनी जयपूरच्या महात्मा गांधी मेडिकल कॉलेजमधून 'एमबीबीएस'ची पदवी मिळवली.
डॉक्टर होऊनही त्यांना नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्याची इच्छा होती.
रवि मोहन सैनी 2012 मध्ये UPSC मुख्य परीक्षा पास करू शकला नाही.
2013 मध्ये त्यांची भारतीय टपाल विभागाच्या लेखा आणि वित्त सेवा विभागात सरकारी नोकरीसाठी निवड झाली. त्यानंतर 2014 मध्ये मेडिकल इंटर्नशिप दरम्यान त्यांनी पुन्हा 'यूपीएससी'ची परीक्षा दिली.
सैनी यांनी ऑल इंडिया 461 रँक मिळवत. गुजरातचे आयपीएस अधिकारी बनले.