युद्धाचा इराण, अमेरिका अन् इस्रायलच्या अर्थव्यवस्थांना काय फटका बसला?

Amit Ujagare

1) अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धामध्ये १५ दिवसांची शस्त्रसंधी झाली आहे. पण गेले ४० दिवस सुरु असलेल्या या युद्धामध्ये या तीनही देशांच्या अर्थव्यवस्थांचं मोठ नुकसान झालं आहे.

Iran war impact on India | Sarkarnama

2) युद्ध सुरु झाल्यापासून पहिल्या १२ दिवसांत अमेरिकेचा एकूण खर्च सुमारे १५.५ अब्ज डॉलर (सुमारे १.४० लाख कोटी रुपये) इतका झाला आहे.

Iran war impact on India | Sarkarnama

3) अमेरिकेला या युद्धासाठी दिवसाला सुमारे १.१ अब्ज डॉलर (९,१७० कोटी रुपये) खर्च करावे लागले.

USA | sarkarnama

4) टॉकहॉम क्षेपणास्त्र, पॅट्रियट इंटरसेप्टर सारखी महागडी शस्त्रास्त्र वापरल्यानं अमेरिकेनं केवळ पहिल्या ६ दिवसांतच ४५ हजार कोटी रुपयांचा चुराडा केला.

Iran vs US Israel War Satellite Images

5) यात अमेरिकेची किमान १६ लष्करी विमानं नष्ट झाली. यात अत्याधुनिक एफ-३५ लढाऊ विमान, एफ-१५ आणि १० एमक्यू-९ रीपर ड्रोन्स यांचा समावेश आहे.

Iran vs US Israel War Satellite Images

6) इस्रायलची अर्थव्यवस्था संकटात आली असून या काळात दर आठवड्याला सुमारे ९.४ अब्ज शेकल्स (३ अब्ज डॉलर्स) इतका आर्थिक तोटा सहन करावा लागला.

Iran vs US Israel War Satellite Images

7) इस्रायलच्या तेल अवीव, हैफा, बेनी ब्रॅक व पेटाह टिकवा सारख्या शहरांमधील इमारती आणि शाळांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प तसंच अमेरिकन दुतावासाचं मोठं नुकसान झालं आहे.

Iran vs US Israel War Satellite Images

8) युद्ध संघर्षात इस्रायलचे आत्तापर्यंत २७ नागरिक मारले गेले. १२ सैनिक मृत्यूमुखी पडले. ७,००० हून अधिक लोक जखमी झाले.

Iran vs US Israel War Satellite Images

९) इराणची यात मोठी हानी झाली आहे. सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमेनी यांच्यासह ४० ते २५० वरिष्ठ कमांडर आणि अधिकारी मारले गेले आहेत.

१०) इराणच्या तेल निर्यातीच्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. क्षेपणास्त्र व ड्रोन क्षमता ८० ते ९० टक्क्यांनी कमी झाली. हवाई संरक्षण प्रणाली, रडार, लष्करी तळ, शस्त्र उत्पादनाला मोठा फटका बसला.

Iran war impact on India | Sarkarnama