IRCTC ची बंपर ऑफर:'भारत गौरव' ट्रेनने करा 4 ज्योतिर्लिंगांसह स्टॅच्यू ऑफ युनिटीची सफर; पाहा किती येईल खर्च?

Rashmi Mane

IRCTC ची खास संधी!

ऑगस्ट 2026 मध्ये धार्मिक आणि पर्यटन सफरीचा विचार करत असाल तर IRCTC (इंडियन रेलवे कैटरिंग एंड टूरिज्म कॉर्पोरेशन) ने प्रवाशांसाठी खास "भारत गौरव" ट्रेन टूर जाहीर केली आहे. या प्रवासात 4 ज्योतिर्लिंगांसह स्टॅच्यू ऑफ युनिटीचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.

10 दिवसांची अविस्मरणीय यात्रा

हा विशेष टूर 17 ऑगस्ट 2026 ते 26 ऑगस्ट 2026 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. धार्मिक स्थळांसह ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांची सफर या यात्रेत समाविष्ट आहे.

4 ज्योतिर्लिंगांचे दर्शन

या यात्रेत भाविकांना महाकालेश्वर, ओंकारेश्वर, नागेश्वर आणि सोमनाथ या चार पवित्र ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता येणार आहे. श्रद्धा आणि अध्यात्माचा अनोखा अनुभव या प्रवासात मिळेल.

गुजरातमधील प्रसिद्ध स्थळांची भेट

ज्योतिर्लिंगांव्यतिरिक्त द्वारकाधीश मंदिर, बेट द्वारका आणि गुजरातमधील इतर प्रसिद्ध धार्मिक स्थळांनाही भेट दिली जाणार आहे. त्यामुळे ही यात्रा अधिक आकर्षक ठरते.

स्टॅच्यू ऑफ युनिटीचा भव्य अनुभव

जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचे दर्शनही या टूरमध्ये समाविष्ट आहे. तसेच सिग्नेचर ब्रिजसारख्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळांनाही भेट देता येईल.

प्रवासात मिळणार या सुविधा

पॅकेजमध्ये रेल्वे प्रवास, सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे शाकाहारी भोजन यांचा समावेश आहे. स्थानिक पर्यटनासाठी एसी आणि नॉन-एसी बसची सुविधाही उपलब्ध असेल.

किती आहे टूरचे शुल्क?

स्लीपर क्लाससाठी प्रति व्यक्ती 18,380, 3 एसीसाठी 29,570 आणि 2 एसीसाठी 38,870 इतके शुल्क निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय EMI आणि LTC सुविधाही उपलब्ध आहेत.

बुकिंग कसे कराल?

या टूरसाठी बुकिंग IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा कार्यालयातून करता येईल. मर्यादित जागा उपलब्ध असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करून या खास धार्मिक पर्यटनाचा लाभ घ्यावा.

Next : ...तर अडकतील महत्त्वाची कामे! पॅन कार्ड नसण्याचे तोटे आणि 'हे' 5 मोठे फायदे जाणून घ्या

येथे क्लिक करा