Amit Ujagare
सर्वसामान्य घरगुती ग्राहकांना नियमित एलपीजी सिलेंडरवरील सबसिडी बंद झाली आहे. फक्त प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे (PMUY) पात्र लाभार्थी आणि काही राज्य योजनांमधील लाभार्थ्यांनाच सबसिडी मिळते आहे.
उज्ज्वला लाभार्थ्यांना १४.२ किलोच्या सिलिंडरवर साधारण ₹३०० प्रति सिलिंडर (फक्त ९ सिलिंडर्ससाठी) रक्कम थेट बँक खात्यात DBT (PAHAL) द्वारे जमा होते.
उज्ज्वला योजनेतील महिला लाभार्थ्यांनाच ही सबसिडी मिळते. काही राज्यांत अतिरिक्त योजना (उदा. महाराष्ट्रातील लाडकी बहीण/अन्नपूर्णा, UP, हरियाणा इ.) वार्षिक उत्पन्न ₹१० लाखांपेक्षा जास्त असेल तर सबसिडी बंद आहे.
मोबाईलवर mylpg.in वेबसाइट उघडा. तुमची गॅस कंपनी निवडा (उदा. Indane, Bharat gas, HP Gas). रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा १७ अंकी LPG ID टाका. त्यानंतर Subsidy/PAHAL/Subsidy Transfer Details मध्ये पाहा.
Indian Oil ONE अॅप, Hello BPCL / Bharatgas अॅप, HP Pay / HP Gas अॅप या गॅस कंपनींच्या अॅपमध्ये लॉगिन करून 'Subsidy Status' किंवा 'Booking History' तपासा.
ज्यांना सबिसिडी लागू आहे त्यांना रिफिल डिलिव्हरीनंतर २-४ दिवसांत रक्कम थेट बँकेत जमा होते. बँक अॅप/पासबुकमध्ये 'LPG Subsidy', 'PAHAL', 'DBTL' किंवा 'DBT' सर्च करा. SMS देखील येतो, तो ही तपासू शकता.
पात्र लाभार्थ्यांना सबसिडी बँक खात्यात का जमा होत नाही? याचं कारण म्हणजे e-KYC/बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण नसल्यास (ऑक्टोबर २०२६ पासून अनिवार्य), आधार-बँक लिंक नसल्यास, उत्पन्न मर्यादा ओलांडल्यास, मोबाईल नंबर अपडेट नसल्यास.
गॅसच्या सबसिडीची माहिती तुम्ही UMANG अॅपमधूनही तपासू शकता. जर यासाठी काही अडचण येत असल्यास डिस्ट्रिब्युटरला संपर्क साधा किंवा हेल्पलाइन १९०६ किंवा कंपनीचा टोल-फ्री नंबर डायरल करा.