सरकारनामा ब्यूरो
नुकतेच उत्तर कोरियामध्ये एक महत्त्वाचे दृश्य पाहायला मिळाले.
पहिल्यांदाच परेडची सलामी घेतांना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग एकटा दिसला नाही तर त्यांच्या सोबत त्याची मुलगीही दिसली.
तेव्हापासून 'किम जोंग उन'च्या वारसदाराची चर्चा जोरात सुरू झाली आहे.
उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये बुधवारी रात्री अक्राळविक्राळ क्षेपणास्त्रांच्या रांगा दिसल्या. हुकूमशहा किम जोंग परेडची सलामी घेत होते.
परेड संपताच सर्वांच्या नजरा बाल्कनीमधील काळ्या पोशाखात असलेल्या 'किम जोंग उन'च्या मुलीकडे वळाल्या.
गेल्या तीन महिन्यातली त्यांच्या मुलीची सार्वजनिक ठिकाणी ही पाचवी हजेरी आहे.
मंगळवारी रात्री परेडपूर्वी त्यांच्या मुलीनेही उत्तर कोरियाच्या उच्च लष्करी अधिकार्यांसोबत मेजवानीत भाग घेतला होता.
मागच्या काही महिन्यात त्यांची मुलगी अनेक महत्त्वाच्या प्रसंगी दिसली आहे. त्यामुळे उत्तर कोरियाचा भावी नेता म्हणून त्यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या (ICBM) प्रक्षेपणाच्या वेळी किम जोंगची मुलगी पहिल्यांदा दिसली होती.