Rashmi Mane
अनेकांनी इनकम टॅक्स रिटर्न वेळेवर फाइल केले आहेत, पण रिफंड अजून मिळाला नाही. यामागे काही सामान्य कारणं असू शकतात. चला जाणून घेऊया…
ITR फाइल केल्यानंतर 30 दिवसांच्या आत ई-व्हेरीफिकेशन करणे आवश्यक असते. आधार OTP, नेट बँकिंग किंवा इतर पद्धतींनी व्हेरीफिकेशन करता येते. हे टाळले तर रिटर्न अमान्य होतो आणि रिफंड थांबतो.
कधी कधी रिटर्न व्हेरीफाय होतो, पण प्रोसेसिंग बाकी असते. प्रोसेसिंग पूर्ण झाल्यावरच रिफंड मिळतो. त्यामुळे जास्त वेळ लागत असेल तर CPC-ITR विभागात जाऊन तक्रार नोंदवता येते.
जर रिटर्न फाइल करताना चुकीचा बँक अकाउंट नंबर किंवा IFSC कोड भरला असेल, तर रिफंड येत नाही. अशा वेळी My Bank Details मध्ये बरोबर माहिती अपडेट करून “Refund Reissue” रिक्वेस्ट करावी लागते.
तुमच्यावर मागील वर्षांचे काही थकीत टॅक्स किंवा डिमांड असेल, तर रिफंड अडवला जाऊ शकतो. CPC पोर्टलवर लॉगिन करून डिमांड स्टेटस तपासणे गरजेचे आहे.
जर तुमच्या ITR मध्ये दाखवलेला TDS फॉर्म 26AS किंवा AIS शी जुळत नसेल, तर रिफंड लांबू शकतो. अशा वेळी फरक दुरुस्त करून तक्रार करावी लागते.
पॅन कार्ड आणि आधार जोडलेले नसेल, तर ITR प्रक्रिया अडते. म्हणून दोन्ही लिंक करून ठेवणे महत्त्वाचे आहे.
ITR फाइल केल्यानंतर आणि व्हेरीफाय केल्यानंतर नेहमी रिफंडची स्टेटस तपासत राहा.
हे तुम्ही इनकम टॅक्स पोर्टलवर लॉगिन करून पाहू शकता.