Deepak Kulkarni
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे.
या लोकसभा मतदारसंघासाठी नारी शक्तीचा हुंकार भरला. गेल्यावेळी हुकलेली संधी स्मिता वाघ यांच्याकडे यावेळी चालून आली.
माजी खासदार ए. टी. पाटील यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांची भेट घेतली.
भाजपकडून उमेदवारीसाठी माजी खासदार ए.टी. पाटील हे इच्छुक होते.
उमेदवारीसाठी दिल्लीत गेल्या आठवड्यात तळ ठोकून प्रयत्न केले होते.
आता उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने भाजप उमेदवार बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्याने उमेदवारीसाठी ए. टी. पाटील आता पुन्हा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे
त्यांनी गुरुवारी जळगाव येथे गिरीश महाजन यांची पक्ष कार्यालयात भेट घेतली.
माजी खासदार के. टी. पाटील व गिरीश महाजन यांच्या या भेटीमुळे पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
ए. टी. पाटील यांनी आपली केवळ निवडणूक प्रचाराबाबत महाजन यांच्याशी चर्चा झाली आहे, असे सांगत उमेदवारीबाबत काहीही बोलले नाही