सरकारनामा ब्यूरो
जयललिता यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1948 ला झाला. त्या दोन वर्षाच्या असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
जयललिता यांचा जन्म कर्नाटकातील मेलुरकोट गावात एका तामिळ कुटुंबात झाला.
दक्षिण भारतात देवाप्रमाणे पूजल्या जाणार्या जयललिता या एकेकाळी तमिळ चित्रपटसृष्टीच्या सुपरस्टार होत्या.
जयललिता यांनी वयाच्या पंधरा व्या वर्षी कन्नड चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. यानंतर त्या तामिळ चित्रपटांकडे वळाल्या.
चित्रपटाच्या यशाच्या काळात त्यांनी 300 हून अधिक तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.
1965 ते 1972 या काळात त्यांनी 'एमजी रामचंद्रन' यांच्यासोबत अनेक चित्रपट केले. त्या काळात 'एमजीआर' यांच्यासोबत त्यांची जोडी खूप गाजली.
जयललिता यांनी 'एमजीआर' मुख्यमंत्री असतांना 1982 मध्ये सक्रिय राजकारणाला सुरुवात केली.
डिसेंबर 1987 मध्ये 'एमजीआर' यांचे निधन झाल्यानंतर जयललिता ऑल इंडिया अन्ना द्रविड़ मुनेत्र कळघम पक्षाकडून तामिळनाडूच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या बनल्या.
दक्षिण भारतात त्या 'अम्मा' या नावाने लोकप्रिय होत्या.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतांना सुद्धा जयललिता यांच्या पक्षाने तामिळनाडूत 39 पैकी 37 जागा जिंकल्या होत्या.
एक उत्कृष्ठ अभिनेत्री ते तामिळनाडूच्या सहा वेळा मुख्यमंत्री होण्याचा प्रवास काही सोपा नव्हता.
2016 मध्ये जयललिता यांनी 5 डिसेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला.