Mayur Ratnaparkhe
पक्ष विरोधी कृत्य केल्याप्रकरणी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या जयश्री पाटील यांनी भाजपची ऑफर स्वीकारली आहे.
अखेर आज जयश्री पाटील यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार आहे.
माजी मंत्री मदन पाटील यांच्या निधनानंतर जयश्री पाटील यांनी नेतृत्व सांभाळत सांगली पालिकेत काँग्रेस झेंड्याखाली गट सांभाळला होता.
त्याच्याच बळावर त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण ही मागणी काँग्रेसने नाकारली. यामुळेच त्यांनी विधानसभेला बंड केले होते.
त्यांना विधानसभेला 33 हजार मते मिळाली होती. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा पराभव झाला होता.
यानिमित्ताने काँग्रेसचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नात सून असलेल्या जयश्री पाटील आता भाजपमध्ये आपली नवी इनिंग सुरू करतील.
जयश्री पाटील यांना भाजपमध्ये आणण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख भूमिका बजावली.
खरंतर जयश्री पाटील यांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही प्रयत्न केले होते.
मात्र जयश्री पाटील यांनी भाजप प्रवेशाचा मार्ग निवडल्याने सांगलीत भाजपची ताकद वाढली आहे.