अनुराधा धावडे
१० ऑगस्ट १९६२ रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद (प्रयागराज)येथे अतिक अहमदचा जन्म झाला.घरची परिस्थिती हालाखीची होती.
वयाच्या १७ वर्षीच अतिक अहमदने एकाची हत्या करुन गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवले
गुन्हेगारी जगताचा राजा होण्यासाठी त्याने पोलिस आणि नेत्यांच्या साहाय्याने चांद बाबाचा काटा काढला. पण त्यानंतर तो प्रचंड बेलगाम झाला.
मृत्यूच्या भितीने एकदा त्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यानंतर त्याने जिंवत राहण्यासाठी राजकारणात पाऊल ठेवण्याचे ठरवले.
१९९१, १९९३, १९९६, २००२, २००४ मध्ये निवडणूक लढवली आणि यशही मिळवले. २०१६ पर्यंत तो राजकारणात सक्रीय राहिला
१९८६-२००७ या काळातील एक डझनहून अधिक गुन्ह्यांखाली मायावती यांच्या सरकारने अतीक अहमदला मोस्ट वॉन्टेट घोषित केले. पोलिसांनी अतिकला अटक केली
२०१४ मध्येही अतिक अहमदने पुन्हा निवडणूक लढवली पण त्याला अपयशाचा सामना करावा लागला.
२०१६ मध्ये अखिलेश यादव समाजवादी पक्षाचे अध्यक्ष झाले होते. त्यांनीही अतिकसारख्या माणसाला पक्षात कोणतेच स्थान नसल्याचे जाहीर केले आणि त्याला पक्षातून काढून टाकले
२०१७ मध्ये दहशत माजवणे, धमकावणे आणि तोडफोड केल्याप्रकरणी युपी पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली. तेव्हापासून अतिक तुरुंगातच आहे.