बारावीत गुणवत्ता यादीत आलेल्या अंबादास दानवेंचा कसा होता पुढचा प्रवास?

Amit Ujagare

कार्यकर्तुत्वाला उजाळा

विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांची टर्म संपल्यानं ते आज निवृत्त झाले. यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तुत्वाला उजाळा देत सदस्यांनी निरोप दिला.

Ambadas Danve

दानवेंचा प्रवास

यावेळी भाषणांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवे यांचा लहानपणापासूनचा आत्तापर्यंतचा प्रवास सांगितला.

Ambadas Danve

गुणवत्ता यादीत

1988 मध्ये बारावची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अंबादास दानवे सहाव्या क्रमांकावर गुणवत्ता यादीत आले होते.

Ambadas Danve

वडील एसटीत कामाला

त्यांचे वडील एकनाथराव दानवे हे एसटी महामंडळात कामाला होते. महाविद्यालयात असताना त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली होती.

Ambadas Danve

आरएसएस सदस्य

सुरुवातीला ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. भाजयुमो अर्थात भाजतीय जनता युवा मोर्चात त्यांनी काम करायला सुरुवात केली. तसंच भाजपसाठी देखील त्यांनी काम केलं.

Ambadas Danve

शिवसेनेत प्रवेश

त्यानंतर शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर 2000 मध्ये अंबादास दानवे तत्कालीन औरंगाबादच्या अजबनगर इथून शिवसेनेच्या तिकीटावर नगरसेवक बनले.

Ambadas Danve

विधानसभेला पराभव

त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली परंतू या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

Ambadas Danve

विधानपरिषदेवर निवड

त्यानंतर याच वर्षी त्यांना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आणि ते जिंकून आले.

Ambadas Danve

विरोधीपक्ष नेतेपदी

त्यानंतर शिवसेना फुटली, पण दानवे हे ठाकरेंशी एकनिष्ठ त्यामुळं त्यांना विरोधीपक्ष नेतेपदाची जबाबदीरी देण्यात आली आणि ती त्यांनी योग्यप्रकारे पार पाडली.

Ambadas Danve