Mayur Ratnaparkhe
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एएस ओका यांनी त्यांच्या आईच्या निधनानंतर काही तासांतच अन् त्यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी ११ निकाल दिले.
न्यायाधीश ओका गुरुवारी त्यांच्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईला गेले होते, त्यानंतर शुक्रवारी त्यांच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी दिल्लीला परतले.
शुक्रवारी न्यायाधीश ओका यांनी त्यांच्या नियमित खंडपीठात बसून ११ निकाल दिले आणि नंतर ते भारताच्या सरन्यायाधीशांसह औपचारिक खंडपीठावर बसले, ही एक नवीन परंपरा होती.
न्यायाधीश ओका म्हणाले होते की, सेवानिवृत्त होणाऱ्या न्यायाधीशांनी त्यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी काम न करण्याच्या परंपरेशी ते सहमत नाहीत.
न्यायाधीश ओका यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आणि जून १९८३ मध्ये वकील म्हणून नोंदणी केली.
१९८५-८६ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि माजी लोकायुक्त व्हीपी टिपणीस यांच्या चेंबरमध्ये काम केले.
२९ ऑगस्ट २००३ रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश बनले.
१२ नोव्हेंबर २००५ रोजी त्यांना कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले.
१० मे २०१९ रोजी त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली
येथे त्यांनी ३१ ऑगस्ट २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती होईपर्यंत काम पाहिले.