Rajanand More
जस्टिस इंडिया अहवाल 2025 मध्ये देशातील महिला पोलिसांबाबतची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
देशातील 20.3 लाख कर्मचारी असलेल्या पोलिस दलात अधिक्षक, महासंचालक अशा वरिष्ठ पदांवर महिलांची संख्या एक हजारांहून कमी आहे.
पोलिस खात्यात महिलांसाठी असलेला आरक्षित कोटा एकाही राज्याला किंवा केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण करता आलेला नाही.
देशातील एकूण 3.1 लाख अधिकाऱ्यांमध्ये आयपीएस नसलेल्या स्त्री अधिकाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. खात्यातील 90 टक्के महिला कॉन्स्टेबल दर्जाच्या कर्मचारी आहेत.
2016 ते 2022 या वर्षांत महिला पोलिसांची संख्या वाढली असली तरी हे प्रमाण केवळ 12 टक्के आहे. अधिकारी पातळीवरील ही वाढ मात्र 8 टक्क्यांपर्यंतच सीमित आहे.
2022 मध्ये आयपीएस पदावर केवळ 960 महिला होत्या. त्यामुळे अहवालात महिला अधिकाऱ्यांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
देशातील 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अजूनही 10 टक्क्यांपेक्षा कमी महिला पोलिस आहेत.
भारतीय पोलिस दलात एकूण अधिकारी पदाच्या तब्बल 28 टक्के आणि कॉन्स्टेबल दर्जाच्या 21 टक्के जागा रिक्त असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय मानकानुसार प्रति लाख लोकसंख्येमागे 222 पोलिस हवेत. मात्र, भारतात हे प्रमाणे केवळ 120 एवढेच आहे.