नियम म्हणजे नियम..! धडाकेबाज महिला IPS अधिकारी भिडल्या भाजप आमदाराला

Rajanand More

IPS अंजली विश्वकर्मा

धडाकेबाज महिला आयपीएस अधिकारी अंजली विश्वकर्मा यांची सध्या जोरदार चर्चा होत आहे. त्या थेट भाजप आमदाराला भिडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

IPS Anjali Vishwakarma | Sarkarnama

काय घडलं?

भाजप आमदार अरूण पाठक आणि अंजली यांच्यात झालेल्या वादाचा हा व्हिडीओ आहे. त्यामध्ये अंजली या आमदाराशी थेट भिडताना दिसत आहेत. त्या कानपूरच्या अतिरिक्त पोलिस आयुक्त आहेत. 

BJP MLC Arun Pathak | Sarkarnama

गनर नेण्यास नकार

कानपूरमधील एका क्रिकेट सामन्यासाठी ग्रीन पार्क स्टेडियममध्ये कडक सुरक्षाव्यवस्था तैनात होती. पाठक यांनी गनरलाही आत नेण्यासाठी पोलिसांसोबत हुज्जत घातली. विश्वकर्मा यांनी त्यास नकार दिला. पाठक यांनी राजकीय वजन दाखवूनही त्या नमल्या नाहीत.

IPS Anjali Vishwakarma | Sarkarnama

आधीही डील

पाठक हे इतर पोलिस अधिकाऱ्यांशी वाद घालत असताना अंजली यांनी मी यांना आधीच्या कार्यक्रमातही डील केले होते, असे म्हटल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. त्यावर पाठक अधिकच भडकले होते.

IPS Anjali Vishwakarma | Sarkarnama

सुरक्षेला प्राधान्य

आमदार संतापलेले असतानाही आयपीएस अंजली यांनी शांतपणे त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आपली जबाबदार पार पाडत सुरक्षेला प्राधान्य दिले. अखेर कानपूर महापौरांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद शांत झाला.

IPS Anjali Vishwakarma | Sarkarnama

4 वर्षांतच केली कमाल

अंजली या 2021 मध्ये आयपीएस बनल्या. चार वर्षांतच त्यांनी अनेक मोठी प्रकरणे तडीस नेली आहेत. प्रामुख्याने एका मुलीच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर त्या उत्तर प्रदेशात चर्चेत आल्या.

IPS Anjali Vishwakarma | Sarkarnama

उच्चशिक्षित

अंजली या मुळच्या डेहराडून येथील असून त्यांनी आयआयटी कानपूरमधून एअरोस्पेस इंजिनिअरींगची पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी विदेशात तेल कंपनीत नोकरी केली.

IPS Anjali Vishwakarma | Sarkarnama

महिना 4 लाखांवर पाणी

प्रशासकीय सेवेत येण्यासाठी अंजली यांनी महिला 4 लाख रुपये मिळवून देणारी विदेशातील नोकरी सोडली. दुसऱ्या प्रयत्नात त्या यूपीएससी उत्तीर्ण झाल्या आणि आयपीएस बनल्या.

IPS Anjali Vishwakarma | Sarkarnama

NEXT : अतिरिक्त पोलिस आयुक्त सरकारला भिडले अन् जिंकलेही; कोण आहेत हे IPS अधिकारी?

येथे क्लिक करा.