सरकारनामा ब्युरो
शोभा करंदालजे उडपी-चिकमंगळूर मतदारसंघाच्या खासदार आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत.
शोभा यांची दक्षिणेकडील फायरब्रँड नेत्या म्हणून ओळख आहे.
कर्नाटकमधील राजकीय प्रस्थ आणि संघटनकौशल्य लक्षात घेता त्यांची निवडणूक समितीच्या प्रमुखपदी निवड केली आहे.
शोभा करंदालजे कर्नाटकमध्ये महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वोक्कीलिगा समाजाचे प्रतिनिधित्व करतात.
१९९७ मध्ये त्यांची उडपी जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
१९९९ मधील संकल्प रथयात्रे’मध्ये शोभा यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. तेव्हापासून त्या येडियुरप्पा यांच्या विश्वासू मानल्या जातात.
शोभा यांची २००० मध्ये कर्नाटक भाजपा प्रदेशच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली.
२००८ मध्ये त्यांनी बंगळुरूमधील यशवंतपूर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांचा दणदणीत विजय झाला होता.
शोभा करंदालजे यांची राजकीय वर्तुळात शोभाक्का म्हणून ओळख आहे.त्यांचा कर्नाटकच्या राजकारणात दबदबा आहे.