Karnataka Assembly Election : कर्नाटकसाठी भाजपचे स्टार प्रचारक जाहीर; कुणाकुणाचा समावेश? पाहा खास फोटो!

सरकारनामा ब्यूरो

स्मृती ईराणी :

कर्नाटक निवडणुकांसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये भाजप नेत्या स्मृती ईराणी यांचा ही समावेश आहे. ईराणी या प्रभावी वक्ता म्हणून ओळखले जातात. संसदेतील त्यांची भाषणे गाजली होती.

Smruti Irani | Sarkarnama

निर्मला सीतारामण :

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा ही भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये समावेश आहे. भाजपचा दाक्षिणात्य नेतृत्वाचा चेहरा म्हणून सीतारमण यांच्याकडे पाहिले जाते.

Nirmala Sitaramanan | Sarkarnama

राजनाथ सिंह :

भाजपचे ज्येष्ठ नेते व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे भाजपचे प्रमुख स्टार प्रचारक आहेत. कर्नाटकच्या प्रचारात राष्ट्रीय मुद्द्यांवर जोर देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असू शकते.

Rajnath Singh | Sarkarnama

देवेंद्र फडणवीस :

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्नाटकासाठी स्टार प्रचारक आहेत. विशेषत: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात ते प्रचारासाठी कार्यरत असतील.

Devendra Fadnavis | Sarkarnama

प्रमोद सावंत :

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा ही भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये समावेश आहे. कर्नाटकाच्या काही भागात प्रचाराची धुरा ते सांभाळतील.

Pramod Sawant | Sarkarnama

शिवराजसिंह चौहान :

शिवराजसिंह चौहान यांचाही भाजपच्या स्टार प्रचारकामध्ये समावेश आहे. किमान दोन आठवडे ते कर्नाटकात प्रचारात भाग घेतील असे सांगण्यात येते.

ShivrajSingh Chouhan | Sarkarnama

योगी आदित्यनाथ :

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा कर्नाटकाच्या प्रचारात सामील होणार आहेत. ते काही रोड शो करतील. त्यांच्याकडून हिंदुत्वाचा मुद्दा आणि राममंदिराचा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो.

Yogi Adityanath | Sarkarnama

बी. एस. येडीयुरप्पा :

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते बी. एस. येडीयुरप्पा निवडणुकीसाठी भाजपचे सर्वात महत्त्वाचे नेते आहेत.

B. S. Yediyurappa | Sarkarnama

अमित शहा :

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपसाठी सर्वात मोठ्या स्टार प्रचारकांपैकी एक आहेत. निवडणुकीत ते अनेक सभा घेणार आहेत.

Amit Shah | Sarkarnama

नरेंद्र मोदी :

भाजपचे क्रमांक एकचे स्टार प्रचारक स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. मोदींच्या चेहऱ्यावर या निवडणुकीची भिस्त असेल. मोदी स्वत: 20 पेक्षा जास्त सभा घेणार आहेत.

Narendra Modi | Sarkarnama

NEXT : राघव चड्डा : राजकारणातील सर्वात सुंदर नेता