सरकारनामा ब्यूरो
कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 साठी केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर घोषणा केली आहे.
'१० मे' रोजी कर्नाटक विधानसभेची निवडणूक होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले.
'13 मे' रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
निवडणूक आयोगाने आज 'पत्रकार परिषद' घेऊन ही माहिती दिली.
निवडणुका जाहीर केल्यामुळे कर्नाटकात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.
कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणुका होणार आहेत.
निवडणुकीत कुणाची सरशी होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.