New CBI Director Praveen Sood : कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची 'सीबीआय'च्या संचालकपदी नियुक्ती

Deepak Kulkarni

...म्हणून हे पद रिक्त होणार होते...

सीबीआय संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ २५ मे रोजी संपणार आहे. यामुळे हे पद रिक्त होणार होते. 

New CBI Director Praveen Sood | Sarkarnama

उच्च स्तरीय समिती

नव्या संचालकपदाची निवड करण्याकरता उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याचा समावेश होता.

New CBI Director Praveen Sood | Sarkarnama

तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची निवड

या समितीने तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची निवड केली होती. ही नावे मंत्रिमंडळाच्या निवड समितीकडे पाठविली होती.

New CBI Director Praveen Sood | Sarkarnama

संचालकपदी नियुक्ती या नावावर शिक्कामोर्तब

त्यापैकी प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) येथे संचालकपदी नियुक्ती झाली आहे.

New CBI Director Praveen Sood | Sarkarnama

सध्या या पदावर कार्यरत..

सूद हे कर्नाटकचे पोलीस महासंचालक पदावर सध्या कार्यरत आहेत.

New CBI Director Praveen Sood | Sarkarnama

या बॅचचे अधिकारी..

ते कर्नाटकचे १९८६ बॅचचे अधिकारी अधिकारी आहेत.

New CBI Director Praveen Sood | Sarkarnama

दोन वर्षांसाठी निवड

पुढील दोन वर्षांसाठी ते सीबीआयचे संचालक असणार आहेत.

New CBI Director Praveen Sood | Sarkarnama

कार्यकाळ वाढवता येतो..

हा कार्यकाळ पाच वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो.

New CBI Director Praveen Sood | Sarkarnama

सूद यांची नियुक्ती सोपी

सरन्यायाधीश आणि पंतप्रधान मोदी यांचे सूद यांच्या नावावर एकमत झाले. तर चौधरी यांनी यावर आक्षेप घेतला होता. यामुळे सूद यांची नियुक्ती सोपी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

New CBI Director Praveen Sood | Sarkarnama

NEXT : आर्यन खानची अटक ते सीबीआयचे छापे; आसा आहे समीर वानखेडेंचा प्रवास