Roshan More
महापूजा
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठलाच्या मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब शासकीय महापूजा केली.
नांदेडच्या हिमायतनगरमधील पोटा गावचे रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर या वारकरी दाम्पत्यालाही महापुजेचा मान मिळाला.
यावर्षी प्रथमच जिल्हा परिषद शाळेतील दोन मुलांना शासकीय महापुजेमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते.
पूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुळशीची माळ घालून आम्हाला सन्मानित करण्यात आले.
या पूजेला एकनाथ शिंदे, पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा डॉ.श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश शिंदे उपस्थित होते.
माझ्या कुटुंबातील चार पिढ्यांना एकत्रपणे या पूजेमध्ये सहभागी होता आले हे मी माझे परम भाग्यच समजतो, असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वारकरी दाम्पत्य वालेगावकर यांचा सन्मान करण्यात आला.
पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते आहे. त्यामुळे राज्यातील बळीराजाला सुखी, समाधानी, आनंदी ठेव, त्यांच्यावरील सर्व संकटे दूर कर, असे साकडे एकनाथ शिंदेंनी विठुरायाच्या चरणी घातले.