गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते आमदार! कोण आहेत कसब्याचे हेमंत रासने?

सरकारनामा ब्यूरो

कसबा पेठचे भाजपचे आमदार आमदार हेमंत रासने यांच्या दिनक्रमाबाबत जाणून घेऊयात

Hemant Rasane | Sarkarnama

सलग तीन वर्षे पुणे महापालिकेत नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष होते. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे विश्वस्त आहेत.

Hemant Rasane | Sarkarnama

कसबा पेठचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे यासाठी रासने यांचे प्रयत्न सुरू आहेत.

Hemant Rasane | Sarkarnama

सकाळी साडेसहा वाजता दिवसाची सुरुवात होते. तासभर मतदारसंघात पायी फिरणे, हाच त्यांचा मुख्य व्यायाम आहे.

Hemant Rasane | Sarkarnama

गोड आवडत असले तरी चहातील साखर पूर्ण बंद केली आहे, असे हेमंत रासने सांगत होते.

Hemant Rasane | Sarkarnama

केवळ शाकाहारी जेवणे, बाहेरचे खाणे बऱ्यापैकी बंद केले आहे, हेच रासनेंच्या निरोगी आरोग्याचे कारण आहे.

Hemant Rasane | Sarkarnama

विधानसभा निवडणुकीपूर्वी वजन खूप वाढले होते. त्यावेळी त्यांनी व्यवस्थित डायट प्लॅन तयार करून घेतला.

Hemant Rasane | Sarkarnama

चालत फिरल्यामुळे कुठे कचरा पडला आहे, अनधिकृत फ्लेक्स लागले आहेत का, अतिक्रमण झाले असेल तर लगेच तेथून अधिकाऱ्यांना फोन लावला जातो.

Hemant Rasane | Sarkarnama

सकाळचे चालणे हा सर्वांत महत्त्वाचा व्यायाम आहे, त्यामुळे मला दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते, असे ते म्हणाले.

Hemant Rasane | Sarkarnama

NEXT: योगी सरकारने उत्तर प्रदेशच्या 'DGP' पदी IPS राजीव कृष्णा यांची केली निवड

येथे क्लिक करा