Rashmi Mane
'आयपीएस' अधिकारी मरिन जोसेफ या भारतीय पोलीस सेवेत (IPS) डेयरिंग बाज अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.
मूळच्या केरळच्या असणाऱ्या, मरिन जोसेफन या पहिल्याच प्रयत्नात 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या.
मरिन जोसेफ यांचा जन्म 20 एप्रिल 1990 ला केरळ मधील एर्नाकुलम येथे झाला, मेरिनच्या जन्मानंतर लगेचच त्यांचे कुटुंब दिल्लीला गेले.
मरिनने त्यांचे शालेय शिक्षण 'कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी स्कूल', नवी दिल्ली येथून केले. शालेय शिक्षणानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या महाविद्यालयातून बीए (ऑनर्स) केले.
पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 188 वा रँक मिळवत 'आयपीएस'ची परिक्षा उत्तीर्ण झाल्या.
मारिन सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत.
IPS प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मरीनची पहिली पोस्टिंग एर्नाकुलममध्ये झाली.
मेरिन जोसेफ या सध्या केरळमधील कोल्लम या शहरात पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.