Rashmi Mane
भूतानचे राजे 'जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक' तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे स्वागत केले.
या दौऱ्यात वांगचुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतली.
वांगचुक यांनी NSA अजित डोवाल यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चाही केली.
वांगचुक यांनी दिल्लीतील महात्मा गांधींच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करत श्रध्दांजली वाहिली.
या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांना द्विपक्षीय सहकार्याच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्याची, विकास आणि आर्थिक सहकार्यासह जवळची द्विपक्षीय भागीदारी पुढे नेण्याची संधी मिळेल.
भूतानचे परराष्ट्र व्यवहार आणि व्यापार मंत्री डॉ. तांडी दोरजी वांगचुक यांच्यासोबत आले आहेत.
या आधी 2017 मध्येही ते भारत दौऱ्यावर आले होते.