Rashmi Mane
लातूर जिल्ह्याची निर्मिती १९८२ साली झाली. जिल्ह्याच्या ४० वर्षाच्या प्रशासकीय कारभारात जिल्हाधिकारी म्हणून प्रथमच एका महिलेच्या हाती जिल्ह्याचा कारभार देण्यात आला आहे.
लातूरच्या जिल्हाधिकारी म्हणून वर्षा ठाकूर-घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वर्षा ठाकूर नांदेडला गेल्या सव्वा वर्षापासून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
ठाकूर यांनी बजावलेल्या बालकामगार प्रकल्पाच्या प्रमुख म्हणून केलेल्या कामगिरीची विशेष नोंद शासन व आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेतर्फे घेतली गेली होती.
प्रशासनातील कर्तव्यदक्ष आणि सक्षम महिला अधिकारी म्हणून ठाकून यांचे नाव लौकिक आहे.
ठाकूर यांचे शिक्षण भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये झाले. तिथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
शिक्षणातील विविध टप्पे ओलांडत, प्रशासकीय सेवेत यशस्वी प्रवेश करत, सक्षमपणे अधिकारीपदाची धुरा सांभाळणाऱ्या वर्षा ठाकूर मराठवाड्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी ठरल्या आहेत.