Sharad Pawar Political Journey : बारामती ते दिल्ली ; महाराष्ट्राच्या आधारवडाचा राजकीय प्रवास

Rashmi Mane

महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवणारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याबद्दलच्या खास गोष्टी…

Sharad Pawar political journey | Sarkarnama

वैयक्तिक जीवन

पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला.

Sharad Pawar political journey | Sarkarnama

युवक काँगेसमध्ये प्रवेश

विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले. त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Sharad Pawar political journey | Sarkarnama

युवक काँग्रेसचे अध्यक्ष

वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

Sharad Pawar political journey | Sarkarnama

शिष्यवृत्ती

१९६६मध्ये पवारांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशांना भेट देऊन तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करायच्या पद्धतीचा जवळून अभ्यास करता आला.

Sharad Pawar political journey | Sarkarnama

 विधानसभा

१९६७ च्या विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले. वयाच्या २९व्या वर्षी वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. 

Sharad Pawar political journey | Sarkarnama

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

 १९७२ आणि १९७८ सालच्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. १८ जुलै १९७८ मध्ये शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते.

Sharad Pawar political journey | Sarkarnama

लोकसभा

१९८४ सालची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. 

Sharad Pawar political journey | Sarkarnama

परत विधानसभा

१९८७ साली ९ वर्षांच्या खंडानंतर शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे काँग्रेस(इंदिरा) पक्षात परत प्रवेश केला. २६ जून १९८८ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. तसेच ४ मार्च १९९० रोजी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली होती.

Sharad Pawar political journey | Sarkarnama

पुनः दिल्ली

२६ जून इ.स. १९९१ ला नरसिंह रावांनी शरद पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री सामील केले. परंतू राज्य काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर नरसिंह रावांनी शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सुत्र दिले. त्यांनी ६ मार्च १९९३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा सूत्रे हाती घेतली.

Sharad Pawar political journey | Sarkarnama

चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद

पवारांची मुख्यमंत्रिपदाची चौथी कारकीर्द अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. ते परत मुख्यमंत्री बनून एक आठवडा व्हायच्या आत, १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत भीषण बाँबस्फोट झाले.

Sharad Pawar political journey | Sarkarnama

दिल्लीमध्ये तिसरी फेरी

१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामतीतून विजय मिळवला आणि त्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात उतरले. 

Sharad Pawar political journey | Sarkarnama

राष्ट्रवादी पक्षाची स्थापना

१० जून १९९९ रोजी शरद पवारांनी त्यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची' स्थापना केली.

Sharad Pawar political journey | Sarkarnama

महाराष्ट्राचा खंबीर आधारवड

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांच्या रुपाने महाराष्ट्राला एक खंबीर राजकीय आधार मिळाला. महाराष्ट्र आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी अनेक पदे भुषविली आहेत.

Sharad Pawar political journey | Sarkarnama

Next : शरद पवार यांची मोठी घोषणा अन् नेत्यांना अश्रु अनावर