Rashmi Mane
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचं प्राथमिक शिक्षण घरीच झालं होतं. पुढील शिक्षणासाठी ते लंडनमघल्या हॅरो इथं गेले. त्यानंतर नेहरूंनी केम्ब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयातून Natural Science या विषयाचं शिक्षण घेतलं. त्यांनी इनर टेम्पल इनमधून कायद्याचंही शिक्षण घेतलं होतं.
स्वातंत्र्यलढ्यादरम्यान महात्मा गांधींच्या आवाहनानंतर ते वाराणसीतल्या सरकारी शाळेतून बाहेर पडले. पवाराणसीच्या काशी विद्यापीठानं शास्त्रींना पदवी प्रदान केली.
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी स्वित्झर्लंडमधील इकोल नॉवेल, जिनिवातील इकोल इंटरनॅशनल, पुण्यातील प्युपिल्स ओन स्कूल, ब्रिस्टलमधील बॅडमिंटन स्कूल, विश्वभारती, शांतीनिकेतन आणि ऑक्सफोर्डमधील सोमरवेल कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतलं होतं. कोलम्बिया विद्यापीठाकडून त्यांचा डिस्टिंक्शनबद्दल सन्मानही करण्यात आला होता.
देसाई यांच शालेय शिक्षण सेंट बुसार हाय स्कूलमधून झालं. मुंबई प्रांतातून १९१८ साली त्यांनी विल्सन सिव्हिल सर्विसमधून पदवी मिळवली आहे.
सिंह विज्ञान शाखेची पदवी घेतली होती. तसेच, आग्रा विद्यापीठातून १९२५ साली त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. दिवाणी खटल्यांचे वकील म्हणून त्यांनी गाझियाबादमध्ये प्रॅक्टिसही केली होती.
त्यांचं शालेय शिक्षण वेलहेम बॉयज स्कूल आणि डून स्कूलमध्ये पार पडलं. केम्ब्रिजचं ट्रिनिटी कॉलेज आणि लंडनच्या इम्पेरियल कॉलेजमधून त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचाही कोर्स केला होता.
विश्वनाथ प्रताप सिंह पूना युनिव्हर्सिटी ( सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे) आणि अलाहाबाद युनिव्हर्सिटीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं.
उत्तर प्रदेशच्या सतीश चंद्र पीजी कॉलेजमधून त्यांनी बीएची डिग्री घेतली होती. तर अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्र विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.
नरसिंहराव यांच शालेय शिक्षण कतकुरू गावात झालं. उस्मानिया विद्यापीठाकडून त्यांना बॅचलर्स ऑफ आर्ट्स डिग्री देण्यात आली होती. हिसलॉप कॉलेजमधून त्यांनी त्यांचं कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं.
वाजपेयी यांनी हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेत ग्वालियरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. कानपूरच्या डीएव्ही कॉलेजमधून राज्यशास्त्र विषयाचं एमएचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं.
देवेगौडा यांनी जून १९९६ ते एप्रिल १९९७ या काळात देशाचं पंतप्रधानपद भूषवलं. त्यांनी हसनच्या एलव्ही पॉलिटेक्निक कॉलेजमधून सिव्हिली इंजिनिअरिंग डिप्लोमाचं शिक्षण पूर्ण केलं होतं.
गुजराल यांनी आधी 'बीकॉम' आणि नंतर 'एमएचं' शिक्षण पूर्ण झालं होतं. त्यांनी पुढे पीएचडीही पूर्ण केली होती. शिवाय त्यांना मानद डि.लिट पदवीनेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
सिंग त्यांचं उच्च माध्यमिक शिक्षण पंजाब विद्यापीठात झालं. पुढे ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या न्यूफिल्ड कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्राची डिग्री घेतली. त्यापाठोपाठ अर्थशास्त्रातच डी. फिलचं शिक्षणही त्यांनी पूर्ण केलं आहे.
मोदी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगच्या माध्यमातून राज्यशास्त्र विषयात पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याशिवाय, गुजरात विद्यापीठातून त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्सचं शिक्षण पूर्ण केलं आहे.