Pritam Munde : गोपीनाथ मुंडेंच्या अकाली निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा समर्थपणे पेलणाऱ्या प्रीतम मुंडे

सरकारनामा ब्यूरो

महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे घराण्याचे स्थान हे अत्यंत महत्वाचे आहे.

Pritam Munde | Sarkarnama

गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या राजकारणाचा वारसा पंकजा आणि प्रीतम मुंडे या त्यांच्या दोन्ही मुलींनी पुढे नेला. 

Pritam Munde with Gopinath Munde | Sarkarnama

गोपीनाथ मुंडेच्या पावलावर पाऊल ठेवत प्रीतम यांनी राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या माध्यमातून अनेक विकास प्रकल्प राबवले आहेत.

Pritam Munde with family | Sarkarnama

महाराष्ट्राच्या राजकारणात गोपीनाथरावांच्या उत्तराधिकारी असलेल्या पंकजा मुंडे या सातत्याने चर्चेत असतात. 

Pritam Munde with Pankaja Munde | Sarkarnama

गेल्या दोन वेळेस खासदारकीच्या टर्ममध्ये प्रीतम मुंडे यांनी बऱ्यापैकी आपले स्थान निर्माण केले आहे. 

Pritam Munde | Sarkarnama

प्रीतम मुंडे यांचा आज (17 फेब्रुवारी) वाढदिवस.

Pritam Munde | Sarkarnama

प्रीतम मुंडे यांनी 2005 साली डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून 'एमबीबीएस'ची पदवी घेतली. त्या 'त्वचारोग तज्ज्ञ' होत्या.

Pritam Munde | Sarkarnama

2009 मध्ये प्रीतम मुंडे यांचा विवाह नाशिकच्या गौरव खाडे यांच्याशी झाला.

Pritam Munde with his husband Gaurav Khade | Sarkarnama

2014 साली गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांनी काँग्रेस नेते अशोक पाटील यांचा तब्बल 7 लाख मतांनी पराभव करत लोकसभेत प्रवेश केला. 

Pritam Munde | Sarkarnama