Mangesh Mahale
कोल्हापूर जिल्ह्यात कुरुंदवाड येथे जन्मलेले आणि सध्या अमेरिकेतील विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असलेले डॉ.श्रीनिवास कुलकर्णी यांना खगोलशास्त्रातील प्रतिष्ठेचा ‘शॉ पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
कुलकर्णी यांना मिलिसेकंद पल्सर, गॅमा-किरण फुटणे, सुपरनोव्हा आणि इतर परिवर्तनशील किंवा क्षणिक खगोलीय वस्तूंविषयी केलेल्या अभूतपूर्व संशोधनासाठी खगोलशास्त्रातील प्रतिष्ठेचा शॉ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती या त्यांच्या बहीण आहेत. कुलकर्णी यांचे शालेय शिक्षण हुबळीत झाले.
कुलकर्णी हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि खगोलशास्त्र विभागात कार्यरत आहेत.
कुलकर्णी यांच्यासमवेत अमेरिकेतील स्वी ले थीन आणि प्रा. स्टुअर्ट ऑर्किन (लाइफ सायन्स) आणि पीटर सरनाक (गणित) यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्काराने सन्मानित शास्त्रज्ञांना १२ लाख डॉलर एवढी रक्कम दिली जाते.
कुलकर्णी यांना ॲलन टी. वॉटरमन पुरस्कार, हेलन बी वॉर्नर पुरस्कार, जान्स्की पुरस्कार, ‘इन्फोसिस’ आणि तेल अविव्ह विद्यापीठातील डॅन डेव्हिड फाउंडेशननेही त्यांचा गौरव केला आहे.
स्पंदनशील ताऱ्यांसंबंधीच्या कुलकर्णी यांच्या शोधामुळे शास्त्रज्ञांना ताऱ्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली.
अत्यंत उच्च तापमान आणि घनतेवर पदार्थाचे वर्तन, विश्वाचा आकार आणि वय, मूलभूत भौतिकशास्त्राचे पैलू आदींवरही प्रकाश टाकला आहे.