सरकारनामा ब्यूरो
राधिका कुट्टी ही कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने वयाच्या 14 व्या वर्षी ‘नीनागागी’ या चित्रपटातून तिच्या करियरला सुरुवात केली. यानंतर तिने अनेक चित्रपटांत काम केले आहे.
राधिका कुट्टी यांचा पहिला विवाह व्यावसायिक रतन कुमार यांच्याशी झाला होता. कुटुंब लग्नासाठी तयार नसल्यानं तिनं पळून जाऊन मंदिरात लग्न केले. पण काही दिवसानंतरचं रतन कुमार यांचं निधन झालं.
एच.डी. कुमारस्वामी हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्याचबरोबर ते कन्नड चित्रपटांचे दिग्दर्शकही आहेत. त्यांच्या दुसऱ्या लग्नाची लव्ह स्टोरी ही फिल्मपेक्षाही कमी नाही.
कुमारस्वामीं आणि राधिका यांच्या वयात 27 वर्ष इतका मोठा फरक आहे. ते पहिल्या नजरेत राधिकाच्या प्रेमात पडले होते.
2010 मध्ये कुमारस्वामींनी मोठा खुलासा करत सांगितलं की, त्यांनी 2006 ला राधिका कुट्टी या अभिनेत्रीशी गुपचूप विवाह केला आहे.
2018 ला राधिका यांनी कुमारस्वामी यांचा एकत्रित फोटो व्हायरल झाला होता. त्यावेळी कुमारस्वामी मुख्यमंत्री होणार होते.
राधिकाच्या वडिलांना त्यांचं हे लग्न मंजूर नसल्यानं त्यांनी 4 वर्ष कोणालाही या लग्नाबद्दल कोणालाही सांगितले नाही.
कुटुंबाच्या विरोधात जाऊन कुमारस्वामींबरोबर राधिका यांनी लग्न केले. या दोघांना एक मुलगी देखील आहे.