मराठी भाषा दिन : बाबासाहेबांना पाठिंबा अन् कुसुमाग्रजांच्या कवितांचा बदलला प्रवाह

Amit Ujagare

मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) हा कवी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांना समर्पित आहे. त्यांच्या काव्यानं मराठी साहित्याला नवी उंची दिली. त्यांच्या जीवनात एक भन्नाट किस्सा आहे जो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी जोडलेला आहे.

Kumumagraj

हा किस्सा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक महत्वाचा टप्प्याचा काळ म्हणजे सामाजिक एकात्मतेसाठी केलेल्या काळाराम मंदिर सत्याग्रहावेळचा.

Kumumagraj

१९३० साली नाशिक येथे डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला, हा दलित-मागासवर्गीयांसाठी मंदिरात प्रवेशाचा ऐतिहासिक लढा होता. तेव्हा फक्त १८ वर्षांचे तरुण विष्णू वामन शिरवाडकर (म्हणजे कुसुमाग्रज) यांनी या सत्याग्रहात सक्रिय सहभाग घेतला!

Ambedkar

कुसुमाग्रजांनी आंबेडकरांच्या या लढ्याला पाठिंबा दिला आणि ते प्रत्यक्ष सत्याग्रहात उतरले. हा अनुभव त्यांच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरला.

Kumumagraj

यानंतरच त्यांच्या कवितेचा प्रवाह पूर्णपणे बदलला. आत्मनिष्ठ, प्रेमळ कवितांपासून ते क्रांतिकारी, समाजनिष्ठ, समता-न्यायाच्या लढ्याच्या गर्जना करणाऱ्या कवितांकडे वळला.

Ambedkar_Kumumagraj

यानंतरच्या काळात कुसुमाग्रजांच्या कवितेतून अस्पृश्यता, सामाजिक विषमता, पददलितांचे दुःख, अन्यायाविरुद्ध विद्रोह यांचं चित्रण दिसतं.

Kumumagraj

उदा. ‘अनावरण’ ही कविता थेट डॉ. आंबेडकर यांच्यावर आधारित आहे, जी बोलकी कविता म्हणून ओळखली जाते.

Ambedkar_Kumumagraj

यातून बाबासाहेबांच्या क्रांतीचा प्रभाव स्पष्ट दिसतो, कुसुमाग्रज म्हणतात. "विजयासाठी कविता कधीच नव्हती म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची..." पण बाबासाहेबांच्या लढ्याने त्यांच्या कवितेला समाजासाठी लढण्याची ताकद मिळाली!

Kumumagraj