अनुराधा धावडे
भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि ज्येष्ठ विधिज्ञ के.व्ही.विश्वनाथन यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती पदाची शपथ दिली.
के.व्ही. विश्वनाथन यांचा जन्म 26 मे 1966 रोजी झाला. तामिळनाडूतील कोईम्बतूरजवळील पोल्लाची येथील ते रहिवासी आहे. त्यांचे सर्व शालेय शिक्षण पोल्लाची आरोग्यमाता मॅट्रिक्युलेशन स्कूलमध्ये झाले.
अमरावती सैनिक शाळेत आणि नंतर उथगाई सुसैयप्पर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. कोईम्बतूर लॉ कॉलेजमध्ये पाच वर्षांचा कायद्याचा अभ्यास केला.
भरथियार विद्यापीठ कोईम्बतूर येथून त्यांनी कायद्याची पदवी पूर्ण केली. 1988 मध्ये त्यांनी तामिळनाडूच्या बार कौन्सिलमध्ये प्रवेश घेतला.
दोन दशकांहून अधिक काळ सर्वोच्च न्यायालयात काम केल्यानंतर 2009 मध्ये त्यांची वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.
1988 मध्ये तामिळनाडूतून दिल्लीत आलेल्या के.व्ही. विश्वनाथन यांनी आरके पुरममधील एका खोलीतून सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली.
ते 2030 मध्ये देशाचे सरन्यायाधीशही होतील. सीजेआय बनणारे ते तिसरे तमिळ व्यक्ती आहेत. तर बारमधून देशाचे सरन्यायाधीश होणारे चौथे.
न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन हे 11 ऑगस्ट 2030 रोजी न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला यांच्या निवृत्तीनंतर भारताचे सरन्यायाधीश होणार आहेत